मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आज नागपूर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरूवात झाली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक कोटी साठ लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले असून १ हजार ५६२ कोटींहून अधिक रुपये वितरित झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. हे सरकार दिलेला शब्द पाळणारं सरकार असून ही योजना कधीही बंद होणार नाही अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
जोपर्यंत महिला मुख्य प्रवाहात येत नाहीत तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. मुलींच्या शिक्षणाची चिंता करू नका त्यासाठी सर्वतोपरी मदत करायला सरकार वचनबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं.
योजनेच्या पहिल्या टप्प्यात 25 लाख आणि त्यानंतरच्या टप्प्यात एक कोटी महिलांना आम्ही लखपती दिदी बनवणार आहोत असं त्यांनी सांगितलं. या नोकऱ्या मागणाऱ्या नव्हे तर नोकऱ्या देणाऱ्या बहिणी असतील असं ते म्हणाले. महिलांच्या बाबतीत अपराध करणाऱ्याला आमचं सरकार जास्तीत जास्त सजा देईल असंही फडणवीस यांनी सांगितलं.