जम्मू काश्मीरमधे नव्यानं झालेल्या हिमवृष्टीनंतर, दक्षिण काश्मीरला राजौरी आणि पूँछ भागाला जोडणारा मुघल मार्ग आणि बांदिपोरा- गुरेझ मार्ग वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. सोनमर्गमधे झालेल्या हिमवृष्टीमुळे काल सोनमर्ग- कारगील राष्ट्रीय महामार्गही बंद केल्याची माहिती वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यानं दिली. हवामानात सुधारणा झाल्यावर बंद रस्त्यांवर साठलेला बर्फ काढला जाईल, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. श्रीनगर- जम्मू राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक मात्र सुरू आहे.
तामिळनाडूत चेन्नई, तिरूवल्लूर, कांचिपूरम आणि चेंगलपेट इथं आणखी काही दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
Site Admin | November 12, 2024 2:29 PM | दक्षिण काश्मीर | मुघल मार्ग