ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मल्याळी लेखक एमटी वासुदेवन नायर यांचं काल रात्री केरळमध्ये कोझिकोड इथं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी कोझिकोड इथल्या मावूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. केरळ सरकारनं त्यांच्या निधनानंतर राज्यातआज आणि उद्या दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एम टी वासुदेव नायर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनानं साहित्यविश्वाचं मोठं नुकसान झाल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नायर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून भारताच्या साहित्य आणि चित्रपट विश्वात नायर यांच्या लेखनाचं मोठ योगदान असल्याचं म्हटलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील नायर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. नायर यांच्या लेखनात मानवी भावनांचे सशक्त चित्रण असून त्यांचं कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं त्यानी म्हटलं आहे.
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी यांनी एमटी वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.