एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या बस खरेदी करणार आहे. त्यासाठीमहामंडळा अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज जाहीर केला. तसंच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीनं भाडेतत्त्वावर बस न घेण्याचा निर्णय घेतल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं. नवीन बसेसच्या तिन्ही बाजूंना डिजिटल जाहिरातीची व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी केली.
महामंडळानं उत्पन्न वाढीसाठी पूरक योजना आणाव्यात, कर्मचाऱ्यांचं वेतन प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपर्यंत देण्याची काळजी घेतली जावी, त्यासाठी शासनाकडून महामंडळाला मिळणारा निधी आगाऊ स्वरूपात मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही परिवहन मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या.