जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अर्थात MSME दिवस काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.केंद्रिय मंत्री जीतम राम मांझी यांनी काल नवी दिल्ली इथं झालेल्या उद्यमी भारत या कार्यक्रमांत दोन नवीन योजनांची घोषणा केली. MSME टीम आणि यशस्वीनी अशी या योजनांची नावं आहेत.
डिजीटल कॉमर्स क्षेत्रात ओपन नेटवर्कसाठी पाच लाख लघुउद्योगांना प्रोत्साहन देणं आणिमहिलांच्या उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी तसंच ग्रामीण आणि मागास भागांत महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या लघुउद्योगांना आवश्यक ती मदत आणि सहकार्य पुरवण्याचा यशस्वीनी योजनेचा उद्देश आहे. केंद्र सरकार MSME क्षेत्रात नव्याने कायद्यात सुधारणा करत आहे,यामुळे देशाच्या विकासातील एक उत्प्रेरक म्हणून हा उद्योग विभाग काम करेल असा विश्वास मांझीयांना यावेळी बोलताना व्यक्त केला.