येत्या २ वर्षात शेअर बाजारात नोंदणी करण्याचं महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं नियोजन आहे, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी दिली. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधानसभेत याचे सूतोवाच केलं होते. येत्या ५ वर्षात नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून मिळणाऱ्या वीजेचे एकूण वीज वितरणातलं प्रमाण १३ टक्क्यांवरुन ५२ टक्क्यांपर्यंत नेण्याचं नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.
Site Admin | March 14, 2025 3:33 PM | MSEDCL | Stock Market
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी शेअर बाजारात उतरणार
