एम.पी.एस.सी. अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ष २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं प्रसिध्दीपत्रकाद्वारे केलं आहे.