मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी आश्वासन देऊनसुद्धा युनिअन कार्बाइडचा धोकादायक कचरा जाळण्याविरोधात आज पिथमपूर इथे निदर्शनं करण्यात आली. यावेळी काही समाजकंटकांनी रामकी इन्व्हायरो इंडस्ट्रीजच्या प्रवेशद्वारावर दगडफेकही केली. याच ठिकाणी हा कचरा जाळला जाणार आहे.
अद्याप या ठिकाणी कचरा आणण्यात आलेला नाही किंवा जाळण्याची कोणतीही पूर्वतयारी करण्यात आलेली नाही, असं उप तहसीलदार अनिता बरेठा यांनी स्पष्ट केलं.