विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनसाठी रोख रक्कम देणारं मध्यप्रदेश हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. कर्नाटक, राजस्थान, आणि दिल्ली या राज्यांमध्ये विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स दिली जातात, मात्र मध्यप्रदेशमध्ये स्वच्छता आणि आरोग्य योजने अंतर्गत ७ वी ते १२ वी च्या विद्यार्थिनींच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाते. या योजने अंतर्गत आतापर्यंत सुमारे १९ लाख विद्यार्थिनींना ५७ कोटी १८ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित केल्याचं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी म्हटलं आहे.
Site Admin | August 13, 2024 1:25 PM | Madhya Pradesh | Sanitary Napkins