१४ जानेवारी हा दिवस देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांमधून निवृत्त झालेल्या जवानांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मुंबईत मरीन ड्राइव्ह इथं ५०० निवृत्त जवानांचं संचलन उद्या होणार आहे. यात शौर्यपदक विजेते जवानही सहभागी होतील.
देशाच्या सेवेसाठी निवृत्त जवानांचं योगदान अधोरेखित करणं हा या संचलनाचा उद्देश आहे. १४ जानेवारी १९५३ रोजी स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो.