राज्यात उदंचन जलविद्युत विकसित करण्यासंदर्भात जलसंपदा, महाजनको, द टाटा पॉवर लिमिटेड आणि अवाडा ग्रुप यांच्यामध्ये काल सामंजस्य करार झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हा कार्यक्रम झाला. हा उपक्रम महाराष्ट्राच्या ऊर्जा निर्मिती धोरणाचा मुख्य आधारस्तंभ आहे असं फडणवीस म्हणाले. शाश्वत आणि हरित उर्जा निर्मितीद्वारे राज्याच्या ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं. या कराराच्या माध्यमातून राज्यात २४ हजार ६३१ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे; याद्वारे ५ हजार ६३० मेगावॅट क्षमतेच्या वीजनिर्मितीचं उद्दीष्ट असून १० हजार ३०० जणांना रोजगार मिळेल असा अंदाज आहे.
Site Admin | August 13, 2024 9:18 AM | DCM Devendra Fadnavis