लॉजिस्टिक कामांमधील कर्मचाऱ्यांचं कौशल्य आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं भारतीय लष्कर आणि हवाई दलानं गती शक्ती विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार केला.
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी तसंच भविष्यात जागतिक पातळीवर सक्षम लॉजिस्टिक प्रणाली तयार करण्यासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. लॉजिस्टिक क्षेत्रातील अत्याधुनिक शिक्षण, संशोधन आणि आणि नवीन उपक्रमांसह सशस्त्र दलांना सक्षम बनवण्यासाठी विद्यापीठ महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून काम करेल असं मत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं.