डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापनेसाठी सामंजस्य करार

मुंबईत कांदिवली इथं ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स’च्या स्थापनेसाठी महाराष्ट्र सरकार आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्यातल्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करत असल्याचं गोयल यांनी सांगितलं. २०३६ साली होणारं ऑलिम्पिक भारतातच होईल, तसंच त्या ऑलिम्पिकमध्ये नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

प्रस्तावित सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये खेळाडूंकरता आधुनिक वातानूकुलित वसतिगृह, ॲथलीट्ससाठी सेंट्रल किचन आणि डायनिंग, आंतरराष्ट्रीय दर्जाचं नवीन आधुनिक हॉकी टर्फ, मल्टीपर्पज स्पोर्ट्स हॉल इत्यादींचा समावेश असेल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा