डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 11, 2024 8:37 PM | NIELIT

printer

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात प्रशिक्षणासाठी राज्य सरकार आणि N I E L I T यांच्यात सामंजस्य करार

राज्य सरकार आणि N I E L I T अर्थात राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यात आज नवी दिल्ली इथं सामंजस्य करार झाला. या करारामध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना, रोबोटिक्स, इंडस्ट्री 4.0, राज्यातल्या शासकीय तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या संशोधन आणि विकास केंद्र यांच्यासाठी थ्री डी प्रिंटिंग आणि सहाय्यक तंत्रज्ञानाचा यात समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि इतर शासकीय संस्थाकडून निधी मिळवण्याचंही याचं उद्दिष्ट आहे. 

यावेळी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या करारामुळे विद्यार्थ्यांना उद्योगासाठी आवश्यक प्रशिक्षण मिळेल, असं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा