नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट आणि मॉरिशस सरकार यांच्यात आज मुंबईत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. मॉरिशसचे केंद्रीय मंत्री अॅलन गानू आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
या करारानुसार मॉरिशसमधील कर्करोग रुग्णांना नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा दिली जाईल. तसंच तिथल्या रुग्णालयांतील आरोग्य कर्मचारी, नर्सेस ना प्रशिक्षणाची जबाबदारी या इन्स्टिट्युटला दिली आहे. या करारामुळे महाराष्ट्र आणि मॉरिशसचे संबंध आणखी सुदृढ होतील, असं अॅलन गानू यांनी सांगितलं. या करारामुळे महाराष्ट्र आणि मॉरिशसच्या संबंधात नागपूरचा आणखी एक नवा आयाम जोडला जात असल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आनंद व्यक्त केला.