जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर इथल्या दाचिगाम जंगलात झालेल्या चकमकीत जुनैद अहमद भट हा कुख्यात दहशतवादी ठार झाला. दाचिगाम भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर काल मध्यरात्री शोध मोहीम राबवली. त्यावेळी सुरक्षा दलांचा सुगावा लागलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला भारतीय सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिलं. भट हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर असून २० ऑक्टोबर रोजी गंदरबल जिल्ह्यात बोगदा बांधकामाजवळ झालेल्या स्फोटात त्याचा सहभाग होता, अशी माहिती पोलिसांच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
Site Admin | December 3, 2024 8:32 PM | Jammu & Kashmir