सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात आल्या असून आतापर्यंत चांदा ते बांदा आणि सिंधुरत्न योजनेमधून जिल्ह्यातल्या ३७ हजार लाभार्थ्यांना ४५० कोटी रुपयांहून अधिक रकमेचं वाटप करण्यात आलं आहे. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत झालेल्या बैठकीत दिली. जिल्ह्यामध्ये तब्बल दीडशे नवी हॉटेलं उभारण्यात येणार असून मच्छिमार महिलांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न सुरू असल्यानं पुढील २ ते ३ महिन्यात जिल्ह्याच्या पर्यटनाला वेगळी गती निर्माण होणार असल्याचं केसरकरांनी म्हटलं आहे.
Site Admin | July 29, 2024 7:30 PM | Sindhudurg