डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 27, 2024 7:24 PM | Maharashtra | Rain

printer

राज्यातल्या विविध धरणांमधे ८८ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा

राज्यातल्या विविध धरणांमधे सध्या ८८ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. मुंबईच्या अनेक भागांत आज सकाळी जोरदार पाऊस झाला. हवामान विभागानं आज मुंबई, पालघर, रायगड आणि उत्तर महाराष्ट्र या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबई परिसरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागातही आज जोरदार पाऊस होऊ शकतो, असं हवामान विभागानं कळवलं आहे. 

 

नाशिक मधल्या धरणांमधला पाणीसाठा वाढला असून गंगापूर धरणासह १३ धरणांमधून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. या पावसामुळे ग्रामीण भागात घरांची पडझड झाली आहे. 

 

लातूरमध्ये मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. तर लातूर-धाराशिव सीमेवरच्या  तेरणा नदीपात्रातला विसर्ग कमी करण्यात आला असून सध्या २ हजार २९० क्यूसेक इतका सुरू आहे. 

 

धाराशीव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातल्या सीना कोळेगाव धरण शंभर टक्के भरलं आहे.  या धरणाचे एकूण १७ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू केला आहे. त्यामुळे प्रकल्प परिसर आणि नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा