भारताच्या परकीय चलन भांडारात जुलै २०२४ च्या शेवटच्या हप्त्यात ४ अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे. देशाच्या परकीय चलन भांडारात सध्या ६७० अब्ज डॉलरपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे.
परकीय चलन भांडाराचा हा आतापर्यंतचा सर्वात विक्रमी स्तर असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटलं आहे. दरम्यान, मागच्या सप्ताहात देशाच्या सोन्याच्या साठ्यातही वाढ झाली असून यात १ अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढ झाली आहे.