2024 मध्ये आत्तापर्यंत देशभरात डेंग्यूचे 32 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. 2023 च्या याच कालावधीत देशातील डेंग्यूची रुग्ण संख्या 18 हजार 391 होती असंही ते म्हणाले. केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणा देशातील डेंग्यूच्या उद्रेकाच्या प्रादुर्भावाचा नियमितपणे आढावा आणि निरीक्षण करत असल्याचंही जाधव यांनी सांगितलं.
Site Admin | August 3, 2024 9:54 AM
आत्तापर्यंत देशभरात डेंग्यूचे 32 हजारांहून अधिक रुग्ण
