देशातील 30 कोटींहून अधिक नागरिक सध्या डिजीलॉकर सुविधेचा लाभ घेत आहेत, तसंच सरकारी संस्थांनी डिजीलॉकरच्या इलेक्ट्रॉनिक फॉर्मटमध्ये आतापर्यंत 675 कोटी ई-दस्तऐवज जारी केले आहेत, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री जितीन प्रसाद यांनी काल राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
डिजीलॉकर सुविधेच्या माध्यमातून नागरिकांना त्यांनी महत्त्वाची कागदपत्रं आणि प्रमाणपत्रं डिजिटल मंचावर सुरक्षितपणे ठेवता येतात. याआंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचं पालन करण्यासाठी अत्याधुनिक उपायांचा काटेकोरपणे अवलंब करण्यात येत असल्याचंही प्रसाद यांनी उत्तरात म्हटलं आहे.