आसाममध्ये गेल्या 24 तासांत पुरांमध्ये आणखी पाच जणांचा मृत्यू झाला असून, या हंगामात पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 84 वर पोहोचली आहे. 27 जिल्ह्यांमध्ये 14 लाखांहून अधिक लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. पूरस्थितीमध्ये थोडी आणखी सुधारणा झाली असली तरी 86 महसूल मंडळातील 2500 हून अधिक गावं अजूनही पुराच्या तडाख्यात आहेत आणि राज्यभरात 39 हजार हेक्टरपेक्षा जास्त पीक क्षेत्राचं नुकसान झाले आहे. ब्रह्मपुत्र, बुऱ्हिडीहिंग, दिसांग आणि कुशियारा नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आसाममधील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Site Admin | July 11, 2024 12:55 PM | आसाम | पुर