सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा केलेल्या कारवाईत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून ११ किलो पेक्षा जास्त हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. जप्त कलेल्या अमली पदार्थाचे बाजारमूल्य अंदाजे ११ कोटी ३२ लाख रुपये असल्याचं सीमा शुल्क विभागानं म्हटलं आहे. या संदर्भात विभागाला माहिती मिळाली होती, त्याआधारे ही कारवाई केली केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर बँकॉक इथून आलेल्या एका प्रवाशाची झडती घेतली, तेव्हा त्याच्या बॅगमध्ये लपवून ठेवलेले अंमली पदार्थ आढळले. या प्रवाशाला १९८५च्या अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्याअंतर्गत अटक केली असून, अधिक तपास सुरू असल्याचं सीमा शुल्क विभागानं कळवलं आहे.
Site Admin | December 21, 2024 3:05 PM | hydroponic ganja | Mumbai Airport