गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातल्या अतिसंवेदनशिल पेनगुंडा गावानजीक जंगलात नक्षल्यांनी बांधलेलं स्मारक पोलिसांनी उद्ध्वस्त केलं. २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवादी शहीद सप्ताह साजरा करतात. या सप्ताहात ते स्मारक बांधून दिवंगत नक्षल्यांना श्रद्धांजली वाहतात.पेनगुंडा इथं ११ डिसेंबर पासून नव्यानेच पोलिस मदत केंद्र सुरु झालं असून स्मारकाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून ते उद्ध्वस्त केलं.
Site Admin | December 29, 2024 4:02 PM | gagchiroli
गडचिरोलीत भामरागड तालुक्यातल्या जंगलात नक्षल्यांनी बांधलेलं स्मारक पोलिसांनी केलं उद्ध्वस्त
