डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

Monte-Carlo Masters : रोहण बोपन्ना आणि बेन शेल्टनचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

भारताचा टेनिसपटू रोहण बोपन्ना आणि त्याचा अमेरिकन जोडीदार बेन शेल्टन यांनी फ्रान्समधे सुरू असलेल्या मोन्ते कार्लो मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. बोपन्ना आणि शेल्टन यांनी काल झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाचा फ्रान्सिस्को सेरुंडोलो आणि चिलीचा अलजेन्द्रो यांचा ६-३, ७-५ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत या जोडीचा सामना इटालीयन खेळाडू सिमोन बोलेल्ली आणइ अंद्रेया वावासोरी यांच्याशी उद्या होणार आहे. 

 

पुरूष दुहेरीच्या पहिल्या फेरीत भारताचा युकी भांबरी आणि त्याचा जोडीदार अलेक्सी पोपेरीन यांचा सामना जर्मनीचा जान-लेनार्ड स्ट्रफ आणि ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅलेक्स डी मिनौर यांच्याशी आज होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा