राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै या कालावधीत मुंबईत होणार आहे. या अधिवेशनात २८ जून रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या अधिवेशनाचं कामकाज १३ दिवस चालणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते.
Site Admin | June 14, 2024 7:53 PM | पावसाळी अधिवेशन | राज्य विधिमंडळ
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै दरम्यान
