डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

येत्या २४ तासांत कोकण आणि विदर्भात पावसाची शक्यता

येत्या २४ तासांत कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे,

 

वाशिम शहर तसंच जिल्ह्यात गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

नाशिक जिल्ह्यात आज दिवसभर पावसानं चांगली हजेरी लावली. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर आज नाशिक शहरासह अन्य भागात झालेल्या पावसानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या पावसाने अनेक भागात पाणी साचलं होतं. या भागात ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा