येणारा काळ आयुर्वेदासाठी अनुकूल असून आयुर्वेदात आधुनिक दृष्टिकोन आणि डिजीटल पायभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे, असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. ते आज नागपूरमध्ये श्री विश्व व्याख्यानमालेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
‘आयुर्वेद आणि योगविज्ञान ही भारताची मोठी शक्ती आहे. भारतीय समृद्ध संस्कृती, इतिहास आणि वारसा यामुळेच संपूर्ण जग आपल्याकडे अपेक्षेनं पाहात आहे, असंही ते म्हणाले. आयुर्वेद हे भारतीय संस्कृती आणि इतिहासाच्या स्वाभिमानाचे प्रतिक आहे, असं त्यांनी सांगितलं.