विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान केलं, मात्र ते पोहोचलंच नाही, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मुंबईत वरळी इथं पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात ते आज बोलत होते. लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षांचे जास्त उमेदवार निवडून आले होते, त्यांचे विधानसभेत अगदी थोडे उमेदवार निवडून आले, यावर विश्वास बसत नाही असं ठाकरे म्हणाले. असं होणार असेल तर निवडणूक न लढलेली बरी असं म्हणत ठाकरे यांनी निराशा व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी पदाधिकाऱ्यांना केलं.
Site Admin | January 30, 2025 7:35 PM | Raj Thackeray
विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मनसेनेला केलेलं मतदान पोहोचलंच नाही- राज ठाकरे
