साहित्य संमेलनात राजकारण्यांना बोलावू नका. साहित्य विषयक कार्यक्रम हे साहित्यिकांनी बोलावं आणि राजकारण्यांनी ऐकावं, असेच असले पाहिजेत, अशी अपेक्षा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ते आज पुण्यात, दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण केल्यानंतर बोलत होते. राजमुद्रा आणि लेखणीचा अंतर्भाव असलेल्या बोधचिन्हाची निवड करण्याची शिफारस त्यांनी केली होती. राज्यातल्या राजकारणाची आणि राजकारण्यांच्या भाषेची पातळी अतिशय खाली गेली आहे. या राजकारण्यांना साहित्यिकांनी ठणकावलं पाहिजे, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
Site Admin | October 7, 2024 7:33 PM | Raj Thackeray