बांधकामामुळं निर्माण होणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन न केल्यास २० लाख रुपयेपर्यंत दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईत वायू प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीनं बांधकामामुळे उडणारी धूळ रोखण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं कठोर मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. सुरवातीला ५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात येईल. नंतरही उल्लंघन झालं तर दंडाची रक्कम २० लाख रुपये पर्यंत वाढवण्यात येईल, तसंच बांधकाम रोखण्यात येईल असं या मार्गदर्शक तत्वात म्हटलं आहे.
Site Admin | December 29, 2024 3:22 PM | MMRDA
बांधकामामुळे उडणारी धूळ रोखण्यासाठी एमएमआरडीए चे कठोर मार्गदर्शक तत्वं जारी
