सोलापूर विद्यापीठाकडे असलेल्या जमिनीचा प्रश्न येत्या पंधरा दिवसात मार्गी लावू असं आश्वासन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिलं आहे. सोलापूर इथे झालेल्या एका समारंभात ते बोलत होते. विद्यापीठाकडे ४७२ एकर जमीन असली तरी त्यापैकी बरीचशी जमीन वनविभागाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे विद्यापीठात अंतर्गत सोयीसुविधा तयार करण्यासाठी अडचणी येत असल्याचं कुलगुरू प्रकाश महानोर यांनी या कार्यक्रमात सांगितलं. त्यावर वन तसंच कृषी आणि उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची तसंच मंत्र्यांची बैठक घेऊन विद्यापीठाचा प्रश्न येत्या ३१ मेपूर्वी मार्गी लावण्याचं आश्वासन राम शिंदे यांनी दिलं.
Site Admin | March 31, 2025 6:36 PM | MLA Ram Shinde
सोलापूर विद्यापीठाकडे असलेल्या जमिनीचा प्रश्न येत्या पंधरा दिवसात मार्गी लावू-राम शिंदे
