डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

छत्रपती शिवाजी महाराजांचा १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार – दीपक केसरकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हा अपघात असून त्या जागी राज्य शासनानं भारतीय नौदलाशी समन्वय साधून १०० फूट उंचीचा पुतळा उभारावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं मंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितलं. त्यांनी राजकोट इथं पुतळा जिथे कोसळला त्या ठिकाणाची पाहणी केली आणि त्याच जागी १०० फुटी पुतळा उभारण्यासंबंधी मुंबईला परतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आराखडा तयार करण्या-चं आश्वासन दिलं. या ठिकाणी धक्का उभारून सिंधुदुर्गपर्यंत फेरीद्वारे वाहतूक सुरू केली, तर हे स्मारक पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र होऊ शकतं, असंही केसरकर म्हणाले. पुतळा कोसळणं हा एक अपघात आहे आणि त्या दृष्टीनेच सर्वांनी त्याकडे पहावं. या अपघाताची चौकशी शासन करेल, असं आश्वासन केसरकर यांनी दिलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा