‘मिशन झिरो डेथ’चा एक भाग म्हणून रेल्वे रुळांवरील मृत्यू कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं केलेल्या अथक प्रयत्नांमुळे, अत्यंत प्रभावी परिणाम दिसत आहेत. मध्य रेल्वेनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत रेल्वे रुळावरील मृत्युंची संख्या 14 टक्क्यांनी घटली आहे तर जखमी झालेल्या व्यक्तींची संख्या 10 टक्क्यांनी घटली आहे. अतिक्रमण हे या घटनांचं एक प्रमुख कारण आहे असं या प्रकरणांचं बारकाईनं विश्लेषण केल्यावर दिसून आलं असं मध्य रेल्वेनं म्हटलं आहे. या कालावधीत एकंदर 3 हजार 599 मृत्यू आणि जखमींच्या प्रकरणांपैकी 1 हजार 429 घटना अतिक्रमणामुळे घडल्या आहेत, हे प्रमाण जवळपास 40 टक्के आहे. अशा घटना कमी करण्यासाठी मध्य रेल्वे व्यापक जनजागृती मोहीम राबवून ठोस प्रयत्न करत आहे. ‘मिशन झिरो डेथ’
Site Admin | November 17, 2024 10:36 AM | 'Mission Zero Death' | Indian Railway