डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 30, 2024 2:31 PM | Bangladesh | hindu

printer

बांगलादेश सरकारनं अल्पसंख्याक नागरिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलावीत – भारत सरकारचं आवाहन

बांगलादेश सरकारनं अल्पसंख्याक नागरिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलावीत, असं आवाहन भारत सरकारनं केलं आहे. हिंदू आणि इतर अल्पसंख्यांक नागरिकांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि त्यांना लक्ष्य करत त्यांच्यावर होणारे हल्ले, हे मुद्दे भारतानं प्रकर्षानं मांडल्याचं, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल दिल्लीत सांगितलं. बांगलादेश सरकारनं सर्व अल्पसंख्यांक नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडली पाहिजे, अशी भारताची स्पष्ट भूमिका असल्याचं ते यावेळी म्हणाले. बांगलादेशात चिथावणीखोर वक्तव्य, आणि हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याचं सांगत जयस्वाल यांनी चिंता व्यक्त केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा