देशाच्या किरकोळ किमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर गेल्या महिन्यात घसरुन ५ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यावर आला आहे. ऑक्टोबर महिन्यात हा दर ६ पूर्णांक २ दशांश टक्के इतका होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शहरी भागात हा दर ४ पूर्णांक ८३ दशांश टक्के, तर ग्रामीण भागात तो ५ पूर्णांक ९५ दशांश टक्के इतका आहे.
Site Admin | December 12, 2024 8:12 PM