आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि अरुणाचल प्रदेश या राज्यातल्या महत्त्वाच्या आठ खनिज खाण लिलावाची प्रक्रिया आज पूर्ण झाली. या खाणींमध्ये फॉस्फेट, ग्रेफाइट आणि वॅनेडियम ही खनिज आहेत. ही खनिजं उच्च तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जेच्या वाढीसाठी आवश्यक आहेत.
खनिज क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं टाकलेले हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं खाण मंत्रालयानं म्हटलं आहे. या लिलावामुळे जागतिक खनिज अर्थव्यवस्थेत भारत सक्षम स्पर्धक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला.