अमरावती जिल्ह्यात बडनेरा इथं उभारण्यात येणाऱ्या IIMC अर्थात भारतीय जनसंचार संस्थेच्या उभारणीसाठी निविदा मागवल्या जात असून २७ डिसेंबरपर्यंत निविदा दाखल करता येतील असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी सांगितलं. नागपूर इथं आकाशवाणी, दूरदर्शन, पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो या कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक झाली, यावेळी जाजू बोलत होते.
केंद्रीय लोक निर्माण विभाग नागपूरचे मुख्य अभियंता प्रदीप दीक्षित यांच्याकडून जाजू यांनी IIMC च्या बांधकामाचा आढावा घेतला. इमारतीच्या बांधकामासाठी etender.cpwd.gov.in या संकेतस्थळावर निविदा पाठवाव्यात, असं आवाहन त्यांनी केलं.