‘वेव्ह्ज’ उपक्रमाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ‘मास्टर द आर्ट ऑफ स्टोरीटेलिंग अँड इन्फ्लुएन्स द फ्यूचर’ या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. लेखक-दिग्दर्शक सरस्वती बुय्याला यांनी मुंबईतल्या NFDC मध्ये या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तसंच ॲनिमेशन क्षेत्राच्या भारतातल्या परिस्थितीवरही कार्यशाळेत ऊहापोह झाला. दरम्यान, ‘वेव्ह्ज’अंतर्गत आयोजित केलेल्या रील तयार करण्याच्या स्पर्धेला देशभरातून आणि इतर २० देशांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकंदर ३ हजार ३७९ जणांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे.
Site Admin | February 5, 2025 7:26 PM
‘वेव्ह्ज’ उपक्रमाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ‘मास्टर द आर्ट ऑफ स्टोरीटेलिंग अँड इन्फ्लुएन्स द फ्यूचर’ या कार्यशाळेचं आयोजन
