दृष्टीहीन आणि कर्णबधिर प्रेक्षकांना चित्रपटांचा आनंद लुटता यावा याकरता चित्रपटगृहात विशिष्ट यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याकरता माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडून ई सिनेप्रमाणन या यंत्रणेमधून प्रदर्शनाचं प्रमाणपत्र मिळवताना चित्रपटाला सबटायटल्सची सुविधा किंवा चित्राच्या वर्णनाची जोड देणारी ध्वनीफीत जोडलेली असणं आवश्यक राहील. या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी कालपर्यंत मुदत होती. तोपर्यंत सर्वत्र या मानकांची अंमलबजावणी झाल्याचं सेन्सॉर बोर्डाने कळवलं आहे.
Site Admin | September 16, 2024 3:25 PM | Ministry of Information and Broadcasting