डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 10, 2024 10:33 AM | Ministry of Coal

printer

कोळसा मंत्रालयाच्या फ्लाय अ‍ॅशची विल्हेवाट आणि पुनर्वापरासाठी उपाययोजना

औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून तयार होणाऱ्या फ्लाय ॲश अर्थात राखेची योग्य विल्हेवाट आणि पुनर्निर्मिती करण्यासाठी योग्य दिशेनं पावलं टाकण्यात येत आहे, असं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे. यासाठी 13 औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना 19 खाणींच्या मोकळ्या जागा वाटप करण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी लवकरच केंद्रीय खाण नियोजन आणि संरचना संस्थेच्या मदतीनं एक पोर्टल तयार करण्यात येईल, असंही कोळसा मंत्रालयांनं म्हटलं आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं सांगितल्यानुसार, फ्लाय ॲश या शब्दामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक प्रीसिपिटेटर राख, ड्राय फ्लाय ॲश, तळाची राख, तलावातील राख आणि माऊंड ॲश यासारख्या तयार होणाऱ्या सर्व राखांचा समावेश होतो.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा