देशात कोळसा उत्पादन वाढवण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्रसरकारने आखली आहे. जागतिक पातळीवर खाण उद्योगात कार्यरत कंपन्यांकडे हे काम सोपवण्यात येणार आहे. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता उपलब्ध होईल असं केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. या कंपन्या कोळसा उत्खननाबरोबरच पुनर्वसन, भूसंपादन, पर्यावरण विषयक परवानग्या तसंच केंद्र आणि राज्यसरकारांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबरचा समन्वय ही कामं देखील हाताळणार असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.
Site Admin | August 13, 2024 7:38 PM | Coal production | Ministry of Coal