सन २०२३-२४ या वर्षासाठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचं अंतिम अनुमान कृषी मंत्रालयानं प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार यावर्षी ३३ कोटी २२ लाख टन इतकं विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. २०२२-२३ च्या तुलनेत २६ लाख टनांनी हे उत्पादन जास्त असेल. राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे अनुमान केलं असल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. त्यात तांदळाचं उत्पादन १३ कोटी ७८ लाख टन, गव्हाचं उत्पादन ११ कोटी ३२ लाख टन, तर भरडधान्यांचं उत्पादन १ कोटी ७५ लाख टनापेक्षा जास्त होईल, असा अंदाज आहे.
Site Admin | September 25, 2024 8:13 PM | Ministry of Agriculture