मंकी पॉक्स आजारासंबंधी जनजागृतीसाठी आवश्यक पावलं उचलावी असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं सर्व राज्यसरकारं आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना सांगितलं आहे. मंकी पॉक्सचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं मंत्रालयाने सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात चाचणीसाठी कार्यरत प्रयोगशाळांची यादीही दिली आहे. संसर्ग रोखणे, उपचारांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणे, आवश्यक तिथे विलगीकरणाच्या सोयी उपलब्ध करुन देणे या गोष्टींची काळजी घ्यावी. राज्यात या विषाणूच्या प्रादुर्भाव- प्रसारावर बारकाईने लक्ष ठेवावं असं आरोग्यमंत्रालयाने म्हटलं आहे.
Site Admin | September 27, 2024 2:42 PM | केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय | केंद्रीय आरोग्य | मंकी पॉक्स
मंकी पॉक्सचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी
