विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख रुपये केली जाणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज केली. त्यांच्या उपस्थितीत रत्नागिरी तालुक्यातलं मालगुंड, हे पुस्तकांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं. या लोकार्पण सोहळ्यात तो बोलत होते. मालगुंडच्या कवी केशवसुत स्मारकाच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली. कोकणानं महाराष्ट्राला जेवढे साहित्यिक दिले, तेवढे कोणत्याच प्रांतानं दिले नाहीत, असे गौरवोद्गार सामंत यांनी यावेळी काढले.
कोकणातल्या साहित्यिकांची माहिती देणाऱ्या कोकणसाहित्य सन्मान दालनाचं उद्घाटनही या वेळी झालं. या उपक्रमात मालगुंडमधल्या ३०, तर जवळच्या गणपतीपुळे गावातल्या पाच घरांचा समावेश केला आहे. या घरांमध्ये पुस्तकं ठेवली जाणार आहेत.