डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशात १३ लाख ६८ हजार क्विंटल सोयाबीनची किमान आधारभूत किंमतीनं खरेदी – कृषीमंत्री

सरकारनं आतापर्यंत जवळपास १३ लाख ६८ हजार क्विंटल सोयाबीनची किमान आधारभूत किंमतीनं खरेदी केली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीची मुदत ३१ जानेवारीपर्यंत तर राजस्थानात ४ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली असल्याचंही चौहान यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. राज्य सरकारांनी केलेल्या मागणीनुसार खरेदीची मुदत वाढवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्यानं काम करत असल्याचं सांगत शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार कीटकनाशकं उपलब्ध होतील याची खबरदारी घ्यावी असं आवाहनही त्यांनी राज्य सरकारांना केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा