देशातल्या प्रत्येक घटकाच्या हितरक्षणासाठी केंद्रसरकार काम करत असून त्यामुळे देशवासियांच्या जीवनात मोठा बदल झाला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केलं आहे. नक्शा, अर्थात नॅशनल जिओस्पेशिअल नॉलेज बेस्ड लँड सर्वे ऑफ अर्बन हॅबिटेशन्स च्या पथदर्शी कार्यक्रमाचं उद्घाटन मध्य प्रदेशात रायसेन इथं केल्यानंतर ते जाहीर सभेत बोलत होते.
या मोहिमेत देशातली २६ राज्यं आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमधल्या एकूण १५२ नगरपरिषदांच्या हद्दीतल्या भूखंडांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. यामुळं जमीन मालकीच्या नोंदी पारदर्शी होतील आणि भविष्यातले तंटे टळतील, असं चौहान म्हणाले.
राज्यातल्या शिर्डी, पंढरपूर, बारामती, बदलापूर, वरणगाव, कन्नड, बुलडाणा, घुग्गुस, खोपोली आणि मुर्तीजापूरचा यात समावेश आहे.