डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

खाद्यतेल अभियानांतर्गत सर्व राज्यांनी प्रयत्नांना अधिक गती द्यावी- शिवराजसिंग चौहान

खाद्यतेल उत्पादनात स्वयंपूर्णतेचं उद्धिष्टं गाठण्यासाठी राष्ट्रीय  खाद्यतेल अभियानांतर्गत सर्व राज्यांना प्रयत्नांना अधिक गती द्यावी, असं आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत, याबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याच्या भारताच्या महत्वाकांक्षेचा भाग म्हणून या मोहिमेअंतर्गत २०२५-२६ पर्यंत साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र ऑईलपामच्या लागवडीखाली आणण्याचं उद्धिष्ट आहे. यात काही अडचणी असतील तर त्या दूर करुन, आणि उपलब्ध संसाधनांचा वापर वाढवून लागवडीचं लक्ष्य पूर्ण करण्यावर राज्यांनी भर देणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा