डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गरीबांसाठी यंदा 19 लाखांहून अधिक घरं देणार -शिवराज सिंह चौहान

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरं यंदा देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल पुण्यात केली. किसान सन्मान दिवसाच्या निमित्ताने पुण्यातील कृषीविज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारनं कृषी क्षेत्रासाठीची आर्थिक तरतूद वाढवली असल्याचं त्यांनी सांगितल. 

 

या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुखउपस्थिती होती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक समृद्धकरण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा