डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शाश्‍वत विकासासाठी नैसर्गिक शेती ही काळाची गरज – शिवराज सिंह चौहान

पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पाॅलिटिक्स आणि इकानाॅमिक्स संस्थेच्या अमृत महोत्सव परिषदेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी झाले होते.  आजच्या  राष्ट्रीय शेतकरी दिवसाचं औचित्य साधून,  कृषी संबंधित विद्यापीठांमध्ये होणारे संशोधन आणि नविनीकरणाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असून आमचं सरकार त्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. अद्यायावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहत आणले जाईल, असं चौहान यांनी यावेळी सांगितलं. प्रयोगशाळेत होणारे यशस्वी प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवेत, त्यांचे लाभ शेतकऱ्यांना घेता यायला हवं असंही शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं.

 

शेतीमध्ये वाढत्या उत्पादनाबरोबरच मानवी आरोग्य आणि मातीच्या आरोग्याची सुरक्षितता देखील महत्त्वाची आहे. त्यामुळे विषमुक्त आणि शाश्‍वत विकासासाठी नैसर्गिक शेती करणं ही काळाची गरज असल्याचं केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज पुण्यात केलं.

 

कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था म्हणजे अटारी पुणेच्या वतीनं आयोजित किसान सन्मान दिवस २०२४ शेतकरी आणि ग्रामीण विकास लाभार्थी संमेलनात ते बोलत होते. यावेळी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थित होते.

 

राज्यातील नैसर्गिक शेतीचे  क्षेत्र २०२५ पर्यंत २५ लाख हेक्टरपर्यंत नेण्यात येईल. त्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक समृद्ध करण्याची गरज आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा